राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना आवाहन केले. युती संदर्भात खासदार प्रफुल भाई पटेल ठरवतील त्याप्रमाणे गोंदिया भंडारा जिल्ह्यात काम करू...असे वक्तव्य यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.