एका ट्रेलरने ट्रकला जोरदार धडक दिल्याने या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ३ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजे दरम्यान टेंभुर्णा शिवार येथील हॉटेल शिवप्रसाद समोर उघडकीस आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की, शमशे आलम मोबीन मिया हा त्याच्या ट्रक क्रमांक NL 01 AD 6167 मध्ये जे के पेपर लिमीटेडचे पेपरचे पॅकेटचा माल घेवुन सोनगढ ते कोलकता कडे जात असतांना टेंभुर्णा शिवार येथील हॉटेल शिवप्रसाद समोर अपघात झाला.