अकोला जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिण मध्य रेल्वे वरील वाहतूक विस्कळीत झाले आहे.सलग दुसऱ्या दिवशी अकोट अकोला डेमु ट्रेन रद्द करण्यात आली असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाद्वारा प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे अकोट अकोला डेमु ट्रेनच्या सर्व फेऱ्या उद्या 29 ऑगस्ट रोजी पुन्हा रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे,सलग दुसऱ्या दिवशी अकोट अकोला रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे.