तालुक्यातील ग्राम पणज येथील पुरातन व जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महालक्ष्मी माता यात्रेत हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. बोर्डीनदी काठावर महालक्ष्मी मंदिर व दीपमाळ असून दरवर्षी गौरी पूजनानिमित्त येथे भव्य यात्रा असते पणज व परिसरातील हजारो भाविक मोठ्या भक्तिभावाने यात्रेला येतात माहेरवाशिणी सुधा या यात्रेत आवर्जून हजेरी लावतात. श्री महालक्ष्मीचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. यावेळी महालक्ष्मी मातेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.