शहरातील अतिक्रमणावर गंडांतर आणण्यासाठी महापालिका प्रशासन सक्रिय झाले असून 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता अतिक्रमण विभागाने दगडी पूल मार्गावरील चिकन व मटण दुकानांची अतिक्रमणे हटवली. या कारवाईत रस्त्यावरील अडथळे दूर करण्यात आले. याचबरोबर बाळापूर रोड तसेच बायपास परिसरातील अवैध अतिक्रमनित दुकानांवरही कारवाई करण्यात आली.