मुंब्रा परिसरातील एमएम व्हॅली येथे एका युवकाने चिकन ऑर्डर केले होते,मात्र त्याला चिकन ऐवजी डुकराचे मास आल्याचा आरोप त्याने केला.डुकराचे मास आल्यामुळे तो ऑर्डर केलेला मुस्लिम तरुण आणि इतर नागरिक संताप्त झाले आणि संताप्त जमावाने मुंबईच्या एम एम व्हॅली असलेल्या त्या खाद्यपदार्थाच्या गोडाऊनची तोडफोड केली.मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.