कणकवली तालुक्यातील तळेरे बाजारपेठ येथे साहित्य खरेदी करत असताना एका महिलेचे ३ लाख २८ हजार रूपये किंमतीचे दागिने व रोकड लंपास झाली आहे. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. तर त्या महिलेने याबाबतची तक्रार आज मंगळवार २सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दिली, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती कणकवली पोलीस ठाण्यातून देण्यात आली.