आज ११ सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी ३ वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावती आणि पी. आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, अमरावती यांच्यामध्ये आज महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) स्वाक्षरीत झाला. या कराराचा उद्देश राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० अंतर्गत शैक्षणिक आणि औद्योगिक सहकार्य वाढविणे हा आहे. यामुळे अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांना नागरी आणि तांत्रिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळणार असून त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकता येणार आहे.