औंढा नागनाथ शहरासह तालुक्यात दिनांक 22 ऑगस्ट शुक्रवार रोजी सायंकाळी सहा वाजे दरम्यान बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दरम्यान औंढा नागनाथ शहरातील हरिहर तलाव काठावर असलेल्या मारोती मंदिर येथे मानकरी श्रीदत्त मठाचे महंत शाम गिरी महाराज यांच्या हस्ते आलेल्या बैलजोडीची विधीवंत पूजा करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक जीएस राहिरे, महंत राजगिरी महाराज, नगरसेवक मनोज देशमुख, जमादार गजानन गिरी माधव सूर्यवंशी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती