लग्नात मानपान नीट केला नाही, माहेरहून पैसे आण असे म्हणून सतत होणाऱ्या मानसिक छळास कंटाळून ज्ञानेश्वरी दिपक गडदे (वय २०) या विवाहित तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी शोभा शिवाजी गडदे, शिवाजी काशिनाथ गडदे, समाधान शिवाजी गडदे व दिपक शिवाजी गडदे (रा. गडदेवस्ती, नंदेश्वर) या चौघांविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिक तपास करीत आहेत.