पिंपळगाव बसवंत शहरात नेमिनाथ नगरमध्ये महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केल्याची घटना घडली आहे. दि.6 रोजी सायंकाळी साडेआठ वाजे सुमारास मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांनी पल्लवी तुषार बाफना यांच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची 50 हजार रुपये किमतीची सोनसाखळी लंपास केली असून याबाबत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यान विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती पिंपळगाव पोलिसांनी आज दि. ७ रोजी सायंकाळी सहा वाजता दिली.