लातूर -लातूर शहरात आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी गणरायाचे विसर्जन उत्साहात करण्यात येत असून पोलीस प्रशासनाने डॉल्बीमुक्त गणरायाचे विसर्जन करण्याचे आवाहन केल्याने लातूरकरांनी यावर्षी डॉल्बीला फाटा देत आज सकाळी बारा वाजल्यापासून लातूर शहराच्या मुख्य रस्त्यावरून पारंपारिक वाद्यासह ढोल ताशाच्या गजरात लातूरात गणरायाचे विसर्जन करण्यासाठी मिरवणूक सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.