आ महेश बालदी यांनी रेल्वे प्रवाशांच्या दृष्टिकोनातून दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान उरण ते नेरूळ या महत्त्वपूर्ण रेल्वे मार्गाच्या संदर्भात केंद्रातील संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली. प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच सध्याच्या ४० फेऱ्यांऐवजी ५० फेऱ्या सुरू करण्यासंदर्भातमहत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.त्या अनुषंगाने लवकरात लवकरच अंमलबजावणी होणार आहे . अशी माहिती आ महेश बालदी यांनी दिली .