एरंडोल तालुक्यात उत्राण हे गाव आहे. या गावाच्या शिवारातून नितीन मनोज पाटील हा विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून वाळू चोरी करून नेत होता. हा प्रकार ग्राम महसूल अधिकारी यांच्या निदर्शनास आला तेव्हा त्यांनी ट्रॅक्टर ट्रॉली वाळू असा एकूण दोन लाख ५४ हजार ७१६ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.