कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसरांमध्ये तरुणांनी राडा घातलेला पाहायला मिळाला.तक्रार करण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये आपापसात वाद झाला आणि पोलीस स्टेशन आवारामध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली. त्यानंतर पोलिसांनी धाव घेतली आणि सर्व तरुणांना ताब्यात घेतले ही घटना आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती मिळत आहे तसेच मारहाणीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे