उमरखेड तालुक्याच्या बंदी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र थेरडी येथे बऱ्याच वार्डात छत गळती होत असून त्यामूळे रुग्णांना असुविधा होत असून रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रिय आदिवासी एकता परिषदच्या थेरडी येथील कार्यकर्त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी येथे दौऱ्यावर आले असता त्यांची भेट घेत आपल्या समस्या मांडल्या आहेत.