जिंतूर तालुक्यातील वझर येथे ग्रामपंचायतीच्या पश्चिमेस सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्यांवर रविवारी सायंकाळी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एकूण ६७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये ६ हजार ६०० रुपये रोख रकमेसह मोबाईल आणि दुचाकीचा समावेश आहे. याप्रकरणी शामराव मते, महादेव घोळमे, विष्णू मावड, गजानन मते, ज्ञानेश्वर मते, सुनील वाटाणे आणि संतोष मते यांच्यावर बामणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.