जालना शहर महानगरपालिकेने गणेशमंडळासाठी पुढाकार घेतला असून गणेश मंडळाने केलेल्या भंडार्यातून निर्माण झालेला कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र घटागाडीची व्यवस्था केली असल्याची माहिती जालना शहर महानगर पालिकेच्या वतीने सोमवार दि. 1 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता दिलीय. जालना शहरात दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या वर्षी देखील दि. 27 ऑगस्ट 2025 पासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. घरगुती व सार्वजनिक मंडळात श्री. गणेशाची स्थापना केल्यानंतर मंडळाकडून भंडार्याचे आयोजन करण्यात येत असते.