जिंतूर शहरातील जिंतूर ते परभणी जाणारा मार्ग व जिंतूर ते जालना मार्ग व जिंतूर शहरात जाणाऱ्या रोडवर बुधवार 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11 30 ते दुपारी 3 45 वाजेच्या सुमारास बंजारा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. जिंतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या फिर्यादीवरून आंदोलनकर्त्यांविरोधात जिंतूर पोलीसात आज गुरुवार 11 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 1 21 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.