5 सप्टेंबरला दुपारी पाच वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पिपळा ग्रामपंचायत च्या पुलावर दुचाकी मध्ये चाकू घेऊन फिरणाऱ्या आरोपीला हुडकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अटकेतील आरोपीचे नाव विशाल जुन्नरवार असे सांगण्यात आले असून त्याच्याकडून एक दुचाकी आणि एक चाकू असा एकूण तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे .