शेकाप अलिबाग शहर महिला आघाडीच्या वतीने आज भाजी मार्केट, मच्छी मार्केट, फळ मार्केट तसेच संपूर्ण एस.टी. स्टँड परिसराची मोठ्या उत्साहात स्वच्छता करण्यात आली. गणेशोत्सवाच्या आगमनापूर्वी शहरातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ व स्वच्छतादायी ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे या स्वच्छता मोहिमेतून स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आले.या मोहिमेत सहभागी महिलांनी बाजारपेठ व परिसरातील कचरा, प्लास्टिक व इतर घाण काढून परिसर स्वच्छ केला.