औसा -औसा तालुक्यातील भादा येथील सुपुत्र व सध्या गडचिरोली जिल्ह्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले दिलीप गवळी यांचा गौरव गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल (भा.पो.से.) यांनी केला. गवळी यांनी नक्षल प्रभावित व अतिदुर्गम भागातील नागरिकांना प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी मरकनार-ते-अहेरी बससेवा सुरू करण्याचा पुढाकार घेतला.