मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मा. श्री. मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.यासंदर्भात आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी पत्रकारांशी संवाद साधत बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला ठाम पाठींबा व दर्शविला व स्पष्ट मत व्यक्त केले.