उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आटोपून मुंबईमार्गे भंडाऱ्याकडे परतत असताना भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनाला आज पहाटे भीषण अपघात झाला. नागपूर बायपासवरील उमरेड फाट्याजवळ सकाळी सहाच्या सुमारास घडलेल्या या अपघातात थोडक्यात जीवितहानी टळली.खासदार पडोळे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या फॉर्च्यूनर (एमएच 36 एपी 9911) गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.