वणी शहरालगत असलेल्या पटवारी कॉलनीत जुन्या वादातून एका युवकाला बेदम मारहाण करून चाकूने हल्ला करण्यात आला. यात तो गंभीर जखमी झाला. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या घरमालकालाही चाकूने भोसकले. ही घटना गुरुवारी दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपीवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.