रावेर तालुक्यात विटवा हे गाव आहे. या गावातील रहिवाशी हरी बाजीराव कोळी वय ३८ या तरुणाला सर्पदंश झाला होता. त्याला उपचाराकरिता मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तेव्हा या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.