श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावरील मंदिर बांधकामासाठी आमदार धस यांनी सर्व भाविकांना नम्र आवाहन केले की या मंदिरासाठी लागणारे दगड देगलूरहुन आणले असून त्यांचे घडवणे व बसविणे यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. प्रत्येक दगडाचा आकार व किंमत वेगळी राहणार असून आत्तापर्यंत काही भक्तांनी हजारो सिमेंटच्या गोण्या, तर काहींनी लाखो रुपयांची देणगी देत उदार सहकार्य केले आहे. या मंदिराचा पाया 100x150 फूट एवढा असून, 109 फूट उंच कळसावर नाथ संप्रदायाचा ध्वज फडकणार आहे एकूण 72 कोटीचा खर्च लागणार आहे.