कोल्हापुरातल्या इराणी खण या ठिकाणी गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने सार्वजनिक गणेश मंडळाच्या मोठ्या मूर्तींचे विसर्जन हे पर्यावरण पूरक पद्धतीने व्हावे यासाठी इराणी खण या ठिकाणी तराफा आणि क्रेनची सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला इराणी खण या ठिकाणी निरोप देताना अनेक गणेश भक्त पाहायला मिळाले.