खुनाचा प्रयत्न करून फरार असलेल्या सराईत आरोपीला पाथर्डी फाटा,वासन शोरूम येथे पोलिसांनी ताब्यात घेऊन चोरीच्या दहा मोटरसायकल जप्त केल्या आहे.गुन्हे शाखा युनिट दोनकडील पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण व पोलीस हवालदार मनोज परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चोरी केलेली बुलेट मोटरसायकल एक इसम पाथर्डी फाटा परिसरात विक्रीसाठी येणार आहे.त्यानुसार सापळा रचून संतोष अशोक खंगाळ याला ताब्यात घेऊन चोरीच्या दहा मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहे.