खामगाव शहरातील सराफा भागातील अध्याची कोठी मानाच्या लाकड़ी गणपती मंदिरात पुजाअर्चा करून गणरायाची आज दिनांक २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजे दरम्यान स्थापना करण्यात आली. यावेळी सुरज असावाल, संजय झुनझुनवाला, डॉ. अनिल चव्हाण, संजय गिरजापुरे, नवीन झुनझुनवाला, रितेश खेतान, बावस्कार सर, मिनिष सुनझुनवाला, प्रविण शिंदे, अमित गोयनका, ओम दायमा, राम दायमा आदी उपस्थित होते. तत्पूर्वी फरशी भागातील शेटो पेंटर यांनी तयार केलेली श्रींची मूर्ती घेवून खामगाव शहरातून शहरातून मिरवणूक काढण्यात आली.