पाटोदा तालुक्यातील दगडवाडी येथे मेंढपाळाची डोक्यात दगड घालून हत्या केली होती. त्यानंतर आरोपीने पलायन करत शिरूर तालुक्यातील आनंदगाव परिसरातील डोंगरात दबा धरू बसला. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला पाठलाग करून बेड्या ठोकल्या. ही कारवाई सकाळी करण्यात आली. दरम्यान, मयत आणि आरोपी यांच्यात एकमेकांना चिडविण्यावरून वाद झाल्याचे कारण समोर आले यामध्ये दीपक भिलाल याचा मृत्यू झाला होता विलास मोरे असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.