ठाण्यामध्ये गुंडांची दहशत निर्माण केली आहे.भर दुपारी वर्तक नगरच्या भिमनगर येथे एका डॉक्टरच्या क्लिनिकची तोडफोड करून हल्लेखोर पसार झाले आहेत. हल्लेखोराने दवाखान्याच्या काचा फोडून वैद्यकीय उपकरणांचे नुकसान केले आहे त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. तसेच अचानक घडलेल्या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच वर्तक नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांचा तपास सुरू केला असल्याची माहिती मिळत आहे.