माझ्या मेहनतीला राज्य शासनाने आकार दिला असून वाई, खंडाळा आणि महाबळेश्वरच्या भूमिगत विद्युत वाहिनीचे स्वप्न साकार झाले आहे. त्यासाठी ३९ कोटी ८३ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी शुक्रवारी साडेपाच वाजता दिली. १५ व्या वित्त आयोगाने मंजूर केलेल्या राज्य आपत्ती सौम्यीकरण निधीमधून राज्यातील आपत्ती सौम्यीकरणांतर्गत सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यातील भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.