पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिग्रस शहरातील भवानी माता मंदिर परिसरात आज दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान भवानी यात्रा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडली. परिसरात सकाळपासूनच भक्तांच्या उपस्थितीने यात्रेचे वातावरण गजबजून गेले होते. यात्रेसाठी परिसरात शेकडो नागरिक, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. भाविकांनी भक्तिभावाने दर्शन घेत आपली श्रद्धा व्यक्त केली.