ढोल ताशाच्या भव्य गजरात नागपूरच्या राजाचे आगमन झाले आहे. गणपती बाप्पाच्या भव्य मूर्तीचे यावेळी नागरिकांना दर्शन झाले. बाप्पाची आतुरता सगळ्यांनाच लागलेली होती यावेळी नागपूरकरांनी शेकडोच्या प्रमाणात उपस्थित राहून नागपूरच्या राजाचे स्वागत केले. यादरम्यान ढोल ताशाच्या गजर सुरू होता तसेच या गणपती बाप्पाचे ठिकठिकाणी स्वागतही करण्यात आले. यावेळी गणपती बाप्पाच्या भव्य मूर्तीचे दर्शन ही येथील नागरिकांनी घेतले.