मुंबई येथे आझाद मैदानावर मंत्रिमंडळाने मनोज जरांगे पाटील यांच्या समक्ष हैदराबाद आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करताच धाराशिव मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दि.2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता मराठा बांधवांनी पेढे मिठाई वाटत आणि फटाक्या फोडत डीजेच्या तालावर जल्लोष सुरू केला या मध्ये मोठ्या संख्येने बांधव सहभागी झाले होते.