भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सव निमित्त तक्रार निवारण दिनाचे आयोजन पोलीस मुख्यालय भंडारा येथील पोलीस पोलीस बहुउद्देशीय सभागृहात दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण केले. तक्रार निवारण दिनामध्ये भंडारा जिल्ह्यातील 78 अर्जदार व गैर अर्जदार सहभागी झाले होते. यावेळी पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.