भंडारा जिल्ह्यात वनगुन्ह्यांवर प्रभावी अंकुश ठेवण्यासाठी वने व वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने उपवनसंरक्षक कार्यालय, भंडारा येथे नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. सदर नियंत्रण कक्ष यावर्षी ६ फेब्रुवारीपासून सुरु असून २४x७ तास कार्यरत आहे. भंडारा जिल्हा हा वनसंपदेने नटलेला असून एकूण भौगोलिक क्षेत्र ३७१६.६५ चौ.कि.मी. पैकी ९२५.७८ चौ.कि.मी. क्षेत्र वनक्षेत्र आहे. या विस्तृत वनक्षेत्रात बऱ्याचदा मानव-वन्यजीव संघर्ष, अवैध शिकार, वृक्षतोड, अवैध उत्खनन, वन वनवा, अतिक्रमण, अवैध वाहतूक...