उचगाव गावातील माळी खणी जवळ फिर्यादी संदीप पाटील यांच्या दुचाकी ला संशयित टेम्पोचालक सुरज शिंदे यांनी पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून याबाबत फिर्यादीने गांधीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास गांधीनगर पोलीस करत आहेत.