एका अज्ञात वाहणाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे इसम जखमी झाले.सदर घटना दिनांक १२ रोज शुक्रवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास शहरातील टप्पा परीसरातील हायवेवर घडली.जखमी झालेले प्रदिप बालकदास ढोके रा.बल्लारशा व घनश्याम बापुराव मेश्राम रा.विसापूर यांना ऊपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.सुदैवाने याच वेळी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ताफा नागपुरकडे चालला होता.त्यांनी ताफा थांबवून जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली.