न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत पोळा सणाला मिरवणुकीत डीजे लावल्या प्रकरणी पाथरी पोलिसांनी चार गुन्हे दाखल केले असून डीजे आणि साऊंड सिस्टिम जप्त केले आहेत.अशी माहिती आज दिनांक 24 ऑगस्ट दुपारी चार वाजता मिळाली. यामध्ये पाथरीतील सोनपेठ टी पॉइंट, माळीवाडा, रेनापुर ,वाघाळा येथे कारवाई करण्यात आली.