महाराष्ट्राच्या निर्मितीचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून ओळखले जात असलेल्या कराड शहरासाठी आता नवीन विकासाचे प्रवेशद्वार खुले झाले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नाने राज्य सरकारने दहा कोटी रुपयांचा बंपर निधी मंजूर केला आहे. या माध्यमातून कराड शहराला आता गार्डन सिटी म्हणून नवीन ओळख मिळणार आहे. आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी गुरुवारी दुपारी तीन वाजता आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे.