महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील ११ आगारांमधून शनिवार दि. २३ ऑगस्टपासून गणेशोत्सवासाठी कोकणातील चाकरमन्याच्या दिमतीला सुमारे २६५ बसेस धावणार आहेत. सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव-खंडाळा, फलटण, कोरेगाव, वडूज, दहिवडी, मेढा या ११ आगारातील सुमारे २६५ बसेस कोकणासाठी देण्यात येणार असल्याची माहिती सातारा विभागाकडून शनिवारी सकाळी साडेदहा वाजता मिळाली. गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर सातारा विभागातून गौरी-गणपती जादा वाहतुक केली जात आहे.