मिरज येथील किल्ला भागात सुरू असलेल्या ‘खुशी वन अपार्टमेंट’च्या बांधकामाच्या ठिकाणी 26 ऑगस्ट 2025 रोजी दुर्घटना घडली होती. या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी अचानक भिंत कोसळल्याने आठ ते दहा मजूर पडलेल्या भिंतीखाली अडकले होते. यामध्ये एका कामगाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता तर उर्वरित मजूर गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर पाच दिवस उलटूनही संबंधित ठेकेदार किंवा बांधकाम मालकाविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.या घटनेबाबत माहिती घेतल्यानंतर कामगार न