अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान उघड्या डोळ्यांनी पहावत नसल्याने हवालदिल झालेल्या एका शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.२६) पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ढाकणवाडी येथे घडली. रामभाऊ नानाभाऊ ढाकणे (वय-६९) रा. ढाकणवाडी, ता. केज, जि. बीड असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्यातील ढाकणवाडी येथील रामभाऊ ढाकणे हे मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने तणावात होते.