भंडारा शहरातील अशोकनगर बंगाली कॉलनी येथील अमोल अशोकदास वय 55 वर्षे, लक्ष्मी अमोल दास वय अंदाजे 70 वर्षे व अमोल दास वय अंदाजे 80 वर्षे यांचे त्यांच्या शेजारी राहत असलेली महिला रजनी हंसराज सायरे वय 47 वर्षे यांच्याशी घराचे पाणी जमा होण्याच्या वादातून नेहमीच भांडण होत असतात. दरम्यान दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता दरम्यान अशोक नगर बंगाली कॉलनी येथे रजनी ही आपल्या घरी हजर असताना यातील आरोपींनी तू आमच्या भिंतीवर ठेवलेली पॉलिथिन ला का हात लावली असे बोलून शिवीगाळ केली..