हिंगणघाट: शहरातील वणा नदी पात्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणात घरगुती तसेच सार्वजनिक गणपती विसर्जन होतात. आठ वर्षापासून आधार फाऊंडेशन संस्थापक अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात पर्यावरण समिती गणपती विसर्जनाला निर्माल्य संकलनाचे अभियान राबवीत आहे.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाविकांनी स्वयंस्फुर्तीने या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याने गणेश विसर्जन जलकुंड न्यू मुनिसिपल हायस्कूल येथे जवळपास चारशेपेक्षा जास्त गणेश मूर्तिचे जलकुंडात विसर्जित केले व ५ ट्रॅक्टर निर्माल्य गोळा झाले.