आज शुक्रवार 5 सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने सायंकाळी पाच वाजता माहिती देण्यात आली की चिकलठाणा पोलीस ठाणे हद्दीतील बालगाव शिवारात जबरी चोरी झाल्याची तक्रार फिर्यादी मधुराबाई सुधाकर बनकर यांनी दिली होती या प्रकरणी ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी दोन आरोपींना सोलापूर महामार्गावरून अटक केली आहे सदरील आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.