भंडारा तालुक्यातील माडगी येथील गौतम नलिंद गजभिये वय 19 वर्षे याने आई-वडील मरण पावल्याच्या मानसिक तणावातून घराच्या सिलिंग फॅनला दुपट्टा बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10:45 वाजता दरम्यान घडली आहे. याप्रकरणी अरविंद श्याम कुवर वय 37 वर्षे रा. भीलवाडा यांच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन अड्याळ येथे मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार बाभरे हे करीत आहेत.