शहरातील गोसावी गल्ली येथे एक अनधिकृत हाडांचा कारखाना सुरू असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या कारखान्यात मेलेल्या जनावरांची हाडे आणून ठेवली जातात. हाडे कुजल्याने त्याचा तीव्र वास नदीवेस बौद्ध वसाहत, महात्मा फुले चौक व आसपासच्या नागरी वस्तीपर्यंत पसरत असून नागरिकांना राहणे मुश्किल झाले आहे.स्थानिकांनी वारंवार कारखाना बंद करण्याची मागणी केली तरी कारखान्याच्या मालकाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)